कामगार दिनी राज्यातील ग्रामपंचायत कामगारांचे दोन दिवसीय कामबंद आंदोलन! न्याय न मिळाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :वेतनश्रेणी निवृत्ती वेतन उपदान ग्रॅज्युटी लागू करावी तसेच जीपीएफ ची रक्कम ईपीएफ मध्ये जमा करण्यात यावी, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सेवा लागू करण्यात याव्या. यासह  अन्य प्रमुख मागण्यांसह  मागण्यासाठी आज कामगार दिनानिमित्त ग्रामपंचायत कामगार कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर दोन दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले आहे. या कामबंद आंदोलनात जिल्ह्यातील ६० कर्मचारी सहभागी झाले आहेत.
 
ग्रामपंच्यात कामगार कर्मचाऱ्यांनी आज पासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. राज्यातील एकूण २७,९२० ग्रामपंचायतींमध्ये सुमारे ६०,००० कर्मचारी सेवेत आहेत. त्यामध्ये सफाई कामगार, पाणीपुरवठा कामगार, करवसुली कर्मचारी, लिपिक यांच्यासह इतर पदांवरील कर्मचारी अत्यल्प वेतनात काम करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या वेतनवाढीचा व इतर मागण्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. कर्मचाऱ्यांनी यापूर्वीही आंदोलने, मोर्चे, मेळावे घेतले असून विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सरकारकडून आश्वासने मिळवली आहेत. मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, कामगार मंत्री तसेच अनेक आमदारांनी चर्चांमध्ये सहभाग घेतला असला तरी अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
कामगार दिन हा हक्कासाठी लढणाऱ्या कामगारांचा सन्मानाचा दिवस असताना, राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी अजूनही मूलभूत हक्कांपासून वंचित असल्याची भावना या आंदोलनातून व्यक्त झाली. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर मागण्या तत्काळ मान्य झाल्या नाहीत, तर येत्या काळात आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा या वेळी देण्यात आला.