

बुलढाण्यातील जैन दीक्षा सोहळ्यात दोन जण स्वीकारणार संयमाचे जीवन
Apr 18, 2025, 15:07 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ऐहिक सुख-सुविधांचा त्याग करून संयमाच्या मार्गावर वाटचाल करणे, संन्यासाच्या मार्गावर वाटचाल करणे सोपे काम नाही.. भौतिक इच्छांचा त्याग करून आत्म्याच्या मोक्षाचा मार्ग स्वीकारणारे आजच्या युगातही फार कमी लोक आहेत.. असाच एक दुर्मिळ देखावा आज बुलढाण्यामधील जिजामाता स्टेडियमवर पहायला मिळत आहे..येथे भडगाव येथील 24 वर्षीय तेजस कोचर आणि हिंगोना येथील 25 वर्षीय महिमा बोरा यांनी संयमाचे जीवन स्वीकारले आणि आत्म्याच्या उद्धारासाठी आणि परोपकारासाठी आपले जीवन समर्पित करत आहे..
जैन धर्मातील संयम आणि आत्मशुद्धीच्या मार्गावर पदार्पण करणाऱ्या भडगाव येथील 24 वर्षीय तेजस संजय कोचर आणि हिंगोणा येथील 25 वर्षीय महिमा प्रदीपकुमार बोरा हे दोन तरुण-तरुणींचा दीक्षा समारंभ बुलढाणा येथे अत्यंत श्रद्धायुक्त वातावरणात आज आणि उद्या होत आहे. स्थानकवासी जैन संप्रदायात प्रवेश घेणाऱ्या या दोघांसाठी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, जैन समाजात उत्साहाचे वातावरण आहे. या दीक्षा महोत्सवाचा मुख्य समारंभ आज व उद्या जिजामाता स्टेडियम, बुलढाणा येथे होत आहे. याआधीच्या दिवसांमध्ये दीक्षार्थीनी सांसारिक जीवनातून संयमाच्या वाटेवर प्रवास सुरू करत असल्याचे दर्शन घडवणारे कार्यक्रम संपन्न झाले. दरम्यान रक्षा सूत्र व संयम फेरे सोहळा पार पडले आहे. ज्यात दीक्षार्थी दीक्षा सोहळ्यामुळे भाविकांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.. आजचा हा भव्य दीक्षा सोहळा पाहण्यासाठी हजारो लोकांची मोठी गर्दी झाली होती.