बुलढाणा शहरातील राजगुरे लेआउट मध्ये भर दिवसा दोन घरे फोडली! बुलढाणा अर्बन च्या कर्मचाऱ्याच्या घरातून ४५ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास....शहर पोलिसांसमोर तपासाचे आव्हान!
Jun 5, 2026, 16:11 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा शहरातील राजगुरे लेआउट मध्ये भरदिवसा घरफोडी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घरफोडीत ४५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. या दागिन्यांची आजच्या बाजारभावाने किंमत जवळपास ७ लाख रुपये इतकी होते.
बुलढाणा शहरातील द्वारका नगरातल्या राजगुरे लेआउट मध्ये चंद्रशेखर प्रभाकर पाटील (५३) कुटुंबासह राहतात. ते बुलढाणा अर्बन बँकेत नोकरी करतात.३ जूनला ते आणि त्यांची पत्नी सकाळी साडेदहा वाजता कामे आटोपून ड्युटी साठी गेले होते. जातांना घराला कुलूप लावून गेले होते..मात्र संध्याकाळी सव्वासहाला घरी परतले तेव्हा घराचा कुलूप कोंडा तुटलेला पाहून त्यांना धक्का बसला.
घरात जाऊन पाहणी केली असता घरातील बेडरूम मधील कपाट उघडे दिसले. कपाटातील सोन्याची सौभाग्यवती पोथ(२० ग्राम) , सोन्याची गहपोथ(२० ग्राम) आणि अंगठी(५ग्राम) एवढे दागिने त्यांना गायब दिसले. याशिवाय त्यांच्या घराशेजारील शिवाजी विनायकराव देशमुख यांचे घर फोडूनही त्यांच्या घरातून टायटन कंपनीची हातातील घड्याळ चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोहेकॉ तुळशिदास गुंजकर करीत आहेत.