टन टन टन टन....जुन्या पेन्शन करिता जिल्हा परिषदेत घंटानाद..!!
राज्यात जिल्हा परिषद अंतर्गत काम करणारा कर्मचाऱ्यांचे दीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेल्या मागण्यासाठी बघण्यासाठी आज १० मार्च रोजी बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांकडून काळ्या फीती लावून घंटानांद आंदोलनों करण्यात आले. जुनी पेन्शन योजना लवकरात लवकर लागू करण्यात यावी तसेच लिपिक, लेखा, परिचर , वाहक चालक या कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत वाढ करण्यात यावी, ग्रामविकास विभाग शासन निर्णयांतर्गत जिल्हा परिषद मधील लिपिक वर्गांची वर्ग दोन मध्ये पदोन्नती करण्यात यावी, महाराष्ट्र विकास सेवा श्रेणी वर्ग दोन च्या नियमात सुधारणा करण्यात यावी, परिचर व वाहन चालक या पदावर भरती बंदचा आदेश शासनाने रद्द करावा यासह अन्य मागण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती लावून घंटानंद आंदोलन केले आहे. शासनाने लवकरात वनकर मांगण्या मान्य कराव्या अन्यथा यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असाही ईशारा कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला.