BREAKING बुलडाण्यात थरार! चिमुकला दुसऱ्या मजल्यावर अडकला; खिडक्या बंद,दरवाजाही केला आतून बंद; गॅलरीतून ओरडत होता मम्मा मम्मा... अखेर....
Jan 13, 2025, 17:05 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा शहरातील चिखली रोडवरील इतापी लेआउट मध्ये आज १३ जानेवारीच्या दुपारी अंगावर काटा आणणारा थरार घडला. ३ वर्षाचा चिमुकला घरात अडकला, त्याने दरवाजा आतून बंद केला.. आईला पाहण्यासाठी गॅलरीत आला असता गॅलरीची खिडकी देखील लॉक झाली.. त्यामुळे त्याला घरातही जाता येईना, मम्मा मम्मा म्हणून तो ओरडत होता.. अपार्टमेंटच्या खाली गर्दी जमा झाली, काय करावे कुणालाही सुचेना.. अखेर बुलडा णा नगरपालिकेचे अग्निशामक दल,स्थानिक नागरिक यांनी शर्थीचे प्रयत्न करून चिमुकल्याची सुटका केली..
इतापे ले आऊट मध्ये विघ्नहर्ता अपार्टमेंट मध्ये हा थरार घडला. रियांश सुरडकर (३) असे चिमुकल्याचे नाव आहे. दुपारी ३ वाजेच्या सुमारास रियांशची आई फ्लॅटच्या बाहेर गेली असता रियांश कडून घराचा दरवाजा आतून बंद झाला. तो त्याला उघडता येईना.तो तसाच घराच्या गॅलरीमध्ये गेला. गॅलरीची खिडकी देखील लॉक झाली. त्यामुळे त्याला घरात देखील जाता येईना. अपार्टमेंटच्या खाली गर्दी जमली.त्याचवेळी बिल्डिंग बांधकाम करणारे बिल्डर अश्विन सातपुते, प्रकाश उगले यांनी बांधकामासाठी वापरण्यात येणारा झुला उपलब्ध करून दिला. अपार्टमेंटच्या शेवटच्या मजल्यावरून झुलाखाली सोडण्यात आला. मात्र झुल्यावर कुणालाही चढता येत नव्हते. त्याचवेळी तिथून बांधकामावर मजुरी करण्यासाठी जाणारा रवींद्र पंडित मगर याला सदर प्रकार दिसला. बांधकामावर काम करण्याची सवय असल्यामुळे तो झुल्यावर चढून दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचला, तोपर्यंत बुलढाणा नगरपालिकेचे अग्निशामक दल, बुलढाणा शहर पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले. शर्थीच्या प्रयत्नानंतर अखेर ४५ मिनिटांनी रियांशची सुटका करण्यात आली....