बुलढाण्यात तीन दिवशीय नामजप शिबिराचे आयोजन ! समर्थ सदगुरू श्रीहरी महाराजांची राहणार उपस्थिती

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रामनामाचा प्रसार आणि प्रचारासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालत असलेले समर्थ सद्गुरु श्री श्रीहरी महाराज ( श्रीक्षेत्र माकोडी ) यांच्या कृपाशीर्वादाने बुलढाणेकर भाविकांनी तीन दिवसीय नामजप शिबिराचे आयोजन केले आहे. 

  प.पू. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ७ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान विघ्नहर्ता गणेश मंदिर पाळणाघराजवळ रामनगर बुलढाणा येथे हे शिबिर पार पडणार आहे. राम नामाचा महिमा अगाध आहे. संतांनी स्वअनुभवातून नाम चिंतनाचे महत्त्व कथन केले आहे. "श्रीराम जयराम जय जय राम" या त्रयोदशाक्षरी नामजप शिबिराचा संकल्प बुलढाणेकर राम उपासक मंडळाने केला होता. त्यानुसार ७ फेब्रुवारीला पहाटे ५ वाजता काकडा आरतीने या सोहळ्याचा श्री गणेशा होईल. सकाळी सात वाजता "रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम" या अखंड पहाऱ्याला तर "श्रीराम जय राम जय जय राम "नामस्मरणाला देखील प्रारंभ करण्यात येणार आहे. सकाळी साडेअकरा वाजता रामपाठ त्यानंतर नैवेद्य आरती, सायंकाळी सहा वाजता उपासना व प्रसाद झाल्यानंतर रात्री साडेसात वाजता सौ. राजश्री देशपांडे (चिखली )यांचे प्रवचन होणार आहे. 8 फेब्रुवारीला एकादशीच्या मुहूर्तावर पहाटे काकड आरती , सकाळी ११.३० ला रामपाठ, आरती व फराळ प्रसाद होईल. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता श्री सुयोग गुरुदेव भजनी मंडळ ( बुलढाणा) हे भजन गायन सेवा देणार आहेत.
सायंकाळी सहा वाजता उपासना झाल्यानंतर रात्री आठ वाजता डॉ. कल्याणीताई पद्मने (अकोला) यांचे कीर्तन लाभ भाविकांना होणार आहे. ९ फेब्रुवारीला सकाळी पाच वाजता सौ सुनंदा राऊत काकू ( बुलढाणा) ह्या प.पु . ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर जन्मोत्सवाचे प्रवचन करतील. त्यानंतर साडेपाच वाजता श्री महाराज सेवा, सकाळी नऊ वाजता समर्थ सद्गुरु श्री श्रीहरी महाराज (श्रीक्षेत्र माकोडी ) यांचे प्रवचन , सकाळी दहा वाजता श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज (निरपूरकर) यांचे काल्याचे किर्तन होईल. त्यानंतर नैवेद्य आरती व महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. नामजप शिबिराचा भाविकांनी लाभ घेऊन आपली सेवा रुजू करावी असे आवाहन राम उपासक मंडळ बुलढाणा यांनी केले आहे.