एकाच दिवशी आढळले तीन अजगर; सर्पमित्रांनी दिले जीवनदान..!
Sep 2, 2025, 11:17 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सावळा आणि राजूर गावात एकाच दिवशी तब्बल तीन अजगर आढळले. यामध्ये सावळा गावातच दोन तर राजूर मध्ये एका अजगराचा समावेश आहे. या तिन्ही अजगराना सर्पमित्रांनी जीवनदान दिले.
सावळा येथे शनिवारी रात्री दोन ठिकाणी, तर राजूर येथे रविवारी सकाळी एक अजगर सापडला.
बुलढाण्यातील सर्पमित्र श्रीराम रसाळ आणि वनपाल मोहसिन खान यांच्या मदतीने सर्व अजगरांचे प्राण
वाचविण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे स्थानिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तीनही अजगर वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. वन विभागाने रविवारी हे अजगर तसेच काही अन्य साप ज्ञानगंगा अभयारण्यात सुरक्षितपणे सोडून दिल्याची माहिती वनपाल मोहसिन खान यांनी दिली