बुलढाण्यात झोपडपट्टीला लागलेल्या आगीत तीन घरे खाक! संजू भाऊंनी दाखवली कर्तव्यतत्परता! दीड लाखांची तात्काळ मदत....

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा शहरातील मिर्झा नगर परिसरात १४ मे रोजी मध्यरात्री अचानक आग लागल्याने मोठी हानी झाली आहे. रफीक शहा, मोहम्मद शहा, शेख शकील व त्यांच्या नातेवाईकांच्या झोपडपट्टीतील तीन घरांना भीषण आग लागून घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्य जळून खाक झाले.

Buldhana

ही माहिती परिसरातील नागरिक शहजाद खान व शेख शोएब यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांना दिली. आमदार गायकवाड यांनी तत्काळ प्रतिसाद देत १४ मे रोजी सकाळी ९ वाजता आपल्या कार्यकर्त्यांसह दुचाकीवरून घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पाहणी केल्यानंतर आमदार गायकवाड यांना समजले की, ही घरे वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने या कुटुंबांना शासकीय मदतीचा लाभ मिळू शकत नाही. या कठीण परिस्थितीत त्यांनी सामाजिक संवेदना दाखवत तिन्ही कुटुंब प्रमुखांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची रोख स्वरूपात मदत केली. एकूण दीड लाख रुपयांची मदत देऊन त्यांनी लोकांच्या दुःखात सहभागी होण्याचे मोठे उदाहरण घडवले.
Buldhana
या मदतीमुळे पीडित कुटुंबांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले, आणि त्यांनी आमदार गायकवाड यांचे मनापासून आभार मानले. “संकटाच्या वेळी सगळे दूर झाले, पण आमदार संजुभाऊ गायकवाड धावून आले,” अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
या वेळी शिवसेनेचे शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, प्रा. दादाराव गायकवाड, स्वीय सहायक श्रीकृष्ण शिंदे, शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी, परिसरातील नागरिक व माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.