

चिंतनीय..! बुलडाणा शहरात पंधरा वर्षीय शाळकरी मुलाची आत्महत्या; अल्पवयीन मुले का उचलत आहेत टोकाचे पाऊल? दोन महिन्यांत १० घटना..
Updated: Mar 25, 2025, 14:33 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा शहरात १५ वर्षीय शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली.आज,२५ मार्चच्या दुपारी ही घटना घडली. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याने शाळेच्या गणवेशातच टोकाचा निर्णय घेतला..
बुलडाणा शहरातील जांभरूण रोडवर ही घटना घडली. हर्षल प्रवीण इंगळे (१५, रा. जाभरून रोड,बुलडाणा) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात शिकत होता. घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला आहे.
दोन महिन्यांत १० घटना...
जिल्ह्यात आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत. त्यातच अल्पवयीन मुलांच्या आत्महत्यांचे प्रमाणही वाढत आहे. गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यात १० अल्पवयीन मुला/ मुलींनी आत्महत्या केल्या आहेत. अजाणत्या वयात मुले एवढा टोकाचा निर्णय का घेतात? हा समाजासाठी देखील चिंतनीय विषय बनला आहे..