मोताळा बस स्टँडवर चोरट्यांचा सुळसुळाट! तरोड्याच्या महिलेचे दागिने दामटले...

 
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोताळा बस स्टँड वर भुरट्या चोरांचा हैदोस सुरू आहे. तरोडा येथील एका महिलेला याचा फटका बसला.. महिला बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी महिलेचे दागिने लंपास केले..३० हजार रुपयांचे दागिने दामटल्याचे महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे..
तालुक्यातील तरोडा येथील वंदना किसन जाधव ह्या काल दुपारी सव्वातीनच्या सुमारास येथील मोताळा बसस्थानकावर आल्या. बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील डब्बीत ठेवलेले सोन्याचे टाप्स (किंमत २९ हजार ७०० रुपये) चोरट्यांनी काढून घेतले. दागिने चोरीस गेल्याचे समजताच वंदना जाधव यांनी बोराखेडी पोलीस ठाणे गाठून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बस स्थानक परिसरात चोरीच्या घटना वाढत असून बस स्थानक परिसरात पोलीस कर्मचारी ठेवण्यात यावा अशी मांगणी नागरिकांकडून केली जात आहे.