नळाचे पाणी भरतांना शॉक लागला; देऊळगाव माळी येथे महिलेचा मृत्यू...

 
 
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथे घडली. काल,१७ मार्चच्या दुपारी ही घटना घडली. कमलाबाई विष्णू मगर (५५) असे मृतक महिलेचे नाव आहे..
प्राप्त माहितीनुसार काल दुपारी देऊळगाव माळी येथे नळ आलेले होते. नळाचे पाणी भरतांना कमलाबाई यांना मोटारीचा शॉक लागला. भर दुपारी हा प्रकार घडला, यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पती, मुले , मुली नातवंड असा मोठा परिवार आहे..