BIG BREAKING बुलडाण्याच्या भूमिपुत्राची पुन्हा एकदा व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रचंड बहुमताने निवड! व्हॉईस ऑफ मीडियाची निवडणूक उत्साहात....
गेल्या एक महिन्यापासून व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. या निवडणुकीमुळे राज्याची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त झाली होती. व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी भारतामधल्या संपूर्ण राज्याच्या निवडणुका होणार असे जाहीर केले होते. महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. ऍड.संजीवकुमार कलकुरी आणि सीए सुरेश शेळके या दोघांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. राज्यभरातल्या प्रमुख तीनशे व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी मतदार म्हणून आपली भूमिका बजावली. या निवडणुकीत एकूण ९२ टक्के मतदान झालं. गेल्या तीन वर्षापासून उत्कृष्ट काम करणाऱ्या अनिल म्हस्के यांना प्रथम क्रमांकाचे मतदान देऊन त्यांची पुन्हा प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडणुकीच्या माध्यमातून निवड झाली. प्रथम क्रमांकाचे मतदान, द्वितीय क्रमांकाचे मतदान असे एकूण १३ क्रमांक १३ उमेदवारासाठी दिले होते. पहिल्या पसंतीच्या मतदानाला प्रदेशाध्यक्ष आणि मग इतर पसंती त्या त्या पदाप्रमाणे दिली होती. निवडणुकीच्या माध्यमातून जे पदाधिकारी विजय झालेले आहेत, त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या पदांचा पदभार आला आहे.
प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, प्रदेश सरचिटणीस दिगंबर महाले, कार्याध्यक्ष, मुख्य संयोजक, तथा प्रशासकीय प्रमुख योगेंद्र दोरकर, कार्याध्यक्ष संघटन मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि कोकण विजय चोरडिया, कार्याध्यक्ष संघटन विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मंगेश खाटीक, उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ, उपाध्यक्ष संजय पडोळे, कोकण आणि मुंबई विभागीय अध्यक्ष अरुण ठोंबरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मिलिंद टोके, विदर्भ अध्यक्ष किशोर कारंजेकर,मराठवाडा अध्यक्ष सतीश रेंगे पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन मोहिते, राज्य कार्यवाहक म्हणून अमर चोंदे यांची निवडणुकीच्या माध्यमातून निवड झाली आहे. उर्वरीत आठ जणांची राज्य कार्यकारणी प्रदेशाध्यक्ष लवकरच घोषीत करणार आहेत. येत्या २९ सप्टेंबरला मुंबईच्या प्रेस क्लब येथे सकाळी अकरा वाजता मान्यवर व्यक्तीच्या हस्ते या सर्व पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा, सत्कार सोहळा आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस दिगंबर महाले यांनी दिली आहे.