केस गळती आजाराचे सामाजिक परिणाम! लग्न जमेना, गावात पाहुणेही येत नाहीत....

 
 शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगाव तालुक्यातील ११ गावांमध्ये केस गळती आजाराने नागरिक परेशान आहेत. आता प्रशासनाकडून उपाययोजना राबवणे सुरू झाले असले तरी आजाराचे नेमके समूळ निदान झालेले नाही. दरम्यान या आजाराचे आता सामाजिक परिणाम दिसू लागले आहेत. या गावांमध्ये लग्न थांबली आहेत..नवीन संबंध देखील होत नाहीत. पाहुणे देखील आजाराच्या भीतीने गावात येत नाहीत...
  शेगाव तालुक्यातील पहूरजिरा, कालवड, भोनगांव, बोंडगाँव यासह ११ गावातील नागरिक केसगळती आजाराने त्रस्त झाले आहेत. या गावांमधील पाणी अंघोळीसाठी वापरण्यावर प्रशासनाने बंदी घातली आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाची टीम देखील बाधित गावांमध्ये पोहोचली आहे. दरम्यान काल ICMR चे पथक देखील पोहचले आहेत. एकीकडे प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असली तरी दुसऱ्या बाजूला या आजाराचे सामाजिक परिणाम मात्र भयंकर आहेत..
सध्या लगीन सराई सुरू झाली आहे, मात्र या गावातल्या मुलांना कुणी मुलगी द्यायला तयार होत नाही,शिवाय या गावातल्या मुलींचे देखील लग्न थांबले आहे.बाधीत गावांतील नागरिकांना सलून मध्ये देखील प्रवेश दिला जात नाही...