सार्वजनिक बांधकाम विभागाने उभ्या पिकावर जेसीबी चालवून घेतला शेतीचा ताबा; पूर्वसूचना न देता कारवाई; केल्याची शेतकरी महिलेची तहसीलदारांकडे तक्रार!
Aug 11, 2025, 16:01 IST
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :उभ्या पिकात जेसीबीने पाटीकरण करून सार्वजनिक बांधकाम विभागाने ताबा घेतल्याची तक्रार शेतकरी कमलबाई माने यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. सिंदखेड राजा ते जालना रस्त्यावरील सर्वे नंबर ३७, ३८, ३९ मध्ये उभ्या शेतात जेसीबीने सपाटीकरण करून सार्वजनिक बांधकाम विभागाने ताबा घेतल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सदर जमीन ही आमच्या मालकीची असून सातबारा फेरफार, पीकपेरा, सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे यासाठी निश्चित झालेली जागा सर्वे क्रमांक ३७, ३८ व ३९ मधील हेलिपॅड जवळ निश्चित झाली आहे. सदर जागेवर भूमिअभिलेख सिंदखेडराजा यांच्याकडून प्राप्त मोजणी नुसार सीमा निश्चित करून सांस्कृतिक सभागृहाचे काम सुरू करण्यात आलेले आहे.
सदर सांस्कृतिक भवनासाठी लागणारी साईट ऑफिसची जागा सर्वे क्रमांक ३७, ३८, ३९ मध्ये राजमाता डेअरीच्या समोर व भूमी अभिलेख यांच्या मोजणी नुसार सर्वे क्रमांक ४० च्या बाजूला निश्चित झालेली आहे. सदर जागेवर अज्ञात व्यक्तीकडून तार फेंसिंग करण्यात आले होते. ते कायदेशीररित्या कारवाई करून पोलीस संरक्षणात व महसूल विभागाच्या देखरेखी अंतर्गत भूमिअभिलेख यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत काढण्यात आले असून सांस्कृक्तिक भवनासाठी लागणारे साईट ऑफिसचे काम सुरू करण्यात आलेले आह. गेल्या ५० ते ६० वर्षापासून ही जमीन आमच्या ताब्यात आहे. यासंदर्भात बांधकाम विभागाचे उपअभियंता सत्तिन नाम यांनी सार्वजनिक बांधकाम
विभागाने ही जमीन शासकीय विकासकामासाठी असल्याचे आणि भूमी अभिलेख विभागाच्या नोंदीनुसार ती मोकळी करत असल्याने सांगितले. शेतकरी कमलबाई माने यांनी ही जमीन आपण अनेक वर्षांपासून कसत असल्याचे सांगितले. तसेच, आपल्याला कोणतीही पूर्वसूचना न देता पिकात जेसीबी चालवण्यात आल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे.