पोट्टेहो सुट्टी वाढली रे! शाळा सुरू होण्याची तारीख बदलली! उन्हाच्या चटक्यामुळे राज्य शासनाचा निर्णय; आता १५ जून तर नव्हे "या" दिवशी उघडणार विदर्भातील शाळा....
Jun 11, 2026, 09:30 IST
बुलढाणा(बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यातील शाळा सुरू होण्याच्या वेळापत्रकावरून घोळ सुरू आहे..आधीच या संदर्भातला निर्णय शासनाकडून आला होता मात्र त्या निर्णयाला २४ तास उलटत नाहीत तोच पुन्हा शासनाने जुना निर्णय रद्द केला आहे..
मुंबई पुण्यासह उर्वरित महाराष्ट्रात १५ जूनला शाळा उघडणार होत्या. विदर्भातील शाळांसाठी शाळा उघडण्याची तारीख २२ जून अशी निश्चित करण्यात आली होती. मात्र आधीचे हे आदेश आता पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत..
विदर्भातील प्रचंड उष्णता आणि कडक ऊन लक्षात घेऊन विदर्भातील शाळा १५ जून ऐवजी २२ जूनपासन सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. शिवाय २२ ते ३० जून या काळात सकाळच्या सत्रात शाळा भरवाव्या असेही नियोजन होते. मात्र या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शाळांच्या तारखा पुढे ढकलले आहेत. त्यामुळे आता विदर्भातील शाळा थेट ३० जून पासून सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.