रंगलेल्या डावाचा पोलिसांनी केला बेरंग..! सहा जणांचा करेक्ट कार्यक्रम! खामगाव तालुक्यातील बोरी आडगावची घटना....
Jun 28, 2025, 17:30 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव येथे पोलिसांनी रंगलेल्या डावाचा बेरंग केला. ६ जणांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला..ते जुगार खेळत होते.
खामगाव तालुक्यातील बोरी- अडगाव येथे पैशाच्या हारजीतवर जुगाराचा डाव रंगला होता, याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी २७ जूनच्या संध्याकाळी सव्वा सहा वाजताच्या दरम्यान त्या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला या छाप्यात एकूण सहा जुगाऱ्यांना पोलिसांनी पकडले आहे. गौतम उत्तम सरदार(४१) रा.उमरा, शेख इम्रान शेख चांद(३८)रा.राहता, बाळू गुलाबराव टिकर(४५)रा.बोरी-अडगाव,विशाल देवमन सुरवाडे(३५) रा.बोरी-अडगाव,प्रवीण पदमाकर तळपते(४२) रा.बोरी-अडगाव,राजेश रामभाऊ लाड(४५) रा.राहेर अशी जुगार खेळणाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी या सहाही जुगारींना जुगार खेळताना रंगेहात पकडले आहे. त्यांच्या जवळून रोख ५ हजार ९१० रुपये जप्त केले आहेत. याप्रकरणी एपीआय रवी मुंडे यांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तशी तक्रार दिली आहे.