पाईपलाईन फुटली! सिंदखेडराजाचा पाणीपुरवठा बंद; दुरुस्तीला लागणार दोन दिवस....
Feb 4, 2025, 08:29 IST
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खडकपूर्णा प्रकल्पातून सिंदखेड राजा शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे सिंदखेड राजा शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे..
असोला फाट्यावर ही पाईपलाईन फुटली आहे. पाईपलाईन फुटलेल्या ठिकाणी हजारो लिटर पाणी वाया गेले असून सिंदखेडराजा शहराचा पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. या प्रकाराची माहिती मिळताच मुख्याधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा अभियंता सतीश काकडे यांना तातडीने पाईपलाईन दुरुस्तीचे आदेश दिले आहेत. पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी घटनास्थळी पोहोचली असून पाईपलाईन दुरुस्ती करण्यासाठी किमान दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. पाईपलाईन दुरुस्त होईपर्यंत संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे सिंदखेड राजा शहरातील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन सिंदखेडराजा नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे...