चिखलीत महायुतीच्या महादहीहंडीला उत्स्फूर्त तुफान प्रतिसाद! गर्दीचा उच्चांक! आ. श्वेताताईंच्या मार्गदर्शनात भाजपा युवा मोर्चाचे शिस्तबद्ध आयोजन;

 केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, प्रतापराव जाधवांचीही हजेरी..

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गोकुळाष्टमीच्या पावन दिनी भाजप युवा मोर्चातर्फे आयोजित करण्यात आलेली महायुतीची महादहीहंडी उत्साह-उत्सवाच्या वातावरणात पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर दहीहंडीचे रीतसर पूजन व उद्घाटन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आयुष् मंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते. या महायुतीच्या महादईहंडीला अतिशय तुफान प्रतिसाद मिळाला, चिखलीतील तरुणाईच्या गर्दीचा नवा उच्चांक दहीहंडी ने गाठला..

महाले

प्रास्ताविकात आमदार श्वेताताई महाले यांनी चिखलीतील जनतेसोबतच्या आत्मीयतेचा व विकासाच्या बांधिलकीचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, दहीहंडी हा फक्त उत्सव नसून एकत्र येऊन विकासाची नवी उंची गाठण्याचा संकल्प आहे. विरोधकांनी खोट्या अफवा पसरवल्या तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे काम तातडीने सुरू करून शिवप्रेमींच्या भावनांना न्याय दिला आहे. या वेळी बोलताना रक्षाताई खडसे म्हणाल्या, दहीहंडी आपल्याला शिकवते की आयुष्यात पडल्यावर पुन्हा उठून पुढे जायचे असते. हाच जीवनाचा खरा संदेश भगवान श्रीकृष्णाच्या लीलांतून मिळतो.
चिखली
प्रमुख पाहुणे प्रतापराव जाधव यांनी दहीहंडीला मिळालेला खेळाचा दर्जा अधोरेखित करताना पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. तरुणाईने छत्रपतींच्या विचारांचा आदर्श घेऊन भारत विकसित करण्यासाठी आपली ताकद ओळखली पाहिजे, असे ते म्हणाले. उत्सवाला सिने अभिनेत्री स्नेहा उलाल, मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान तसेच लोकप्रिय अँकर यशा पाळणकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे आकर्षण वाढवले.हजारो युवक-युवतींच्या सहभागाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा सोहळा रंगला. डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणाईने संपूर्ण वातावरण भारून गेले. पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि युवा मोर्चाचे शिस्तबद्ध आयोजन यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही...
चिखली