ICMR ची टीम आज पोहोचणार शेगावात! केस गळती आजाराबाबत होणार संशोधन! केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधवांनी दिले होते निर्देश....
Jan 14, 2025, 09:12 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केस गळती व टक्कल आजारामुळे शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी केसगळती आजाराने बाधित गावांना भेट दिली होती. त्याचवेळी त्यांनी केंद्र सरकारच्या वतीने या आजारावर संशोधन होणार असल्याचे सांगत आयसीएमआर ला तसे निर्देशही दिले होते. ना. प्रतापराव जाधव यांच्या निर्देशाप्रमाणे ICMR ची टीम आज शेगावात दाखल होणार आहे. बाधित गावांमध्ये जाऊन तपासण्याही होणार आहेत. विशेष म्हणजे आयुष मंत्रालयाच्या होमिओपॅथी, आयुर्वेद आणि युनानीच्या पथकाने देखील केस गळती रुग्णांशी संवाद साधला आहे..
शेगाव तालुक्यातील पहुरूजिरा, कालवड, कठोरा, भोंनगांव, बोंडगांव यासह ११ गावातील नागरिकांना केस गळती आजाराने ग्रासले आहे. या भागातील पाणी आंघोळीसाठी वापरण्यावर सध्या प्रशासनाने बंदी घातली आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी ११ जानेवारी रोजी बाधित गावांचा दौरा केला होता, रुग्णांना धीर देत केंद्र सरकार आपल्या पाठीशी असल्याशिवाय सांगितले होते. या आजाराच्या मुळाशी जाण्यासाठी आयुष आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या टीमला देखील आदेश दिले होते. त्यानुसार आयुष मंत्रालयाची टीम कालच शेगाव तालुक्यातील गावांमध्ये पोहोचली आहे. आज भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) ची टीम देखील शेगाव तालुक्यात पोहोचणार आहे...