अवकाळी चा कहर! बुलडाणा जिल्ह्याला येलो अलर्ट; रात्रभर विजांचे धडाम धुडूम; बुलडाणा, मोताळा, नांदुरा तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; पहा खैरा गावातील नुकसानीचे फोटो..

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यभरात हवामान विभागाने वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बुलडाणा जिल्ह्याला येलो अलर्ट चा इशारा देण्यात आलेला आहे. दरम्यान काल,२ एप्रिलच्या रात्री जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळीने कहर केला. रातभर विजांचा धडाम धुडूम सुरू होता. बुलढाणा, मोताळा ,नांदुरा तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचा विस्तृत अहवाल अद्याप पर्यंत प्राप्त झालेला नाही..
   नांदुरा तालुक्यातील खैरा गावात रात्रभर पावसाने थैमान घातली. या पावसाने मका, ज्वारी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. खैरा येथील रवींद्र मापारी यांच्या शेतातील मका पिकाला वादळाचा तडाखा बसल्याने पीक पूर्णपणे झोपलेल्या अवस्थेत गेले आहे.. हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे..