शिवाजी शिक्षण संस्थेला सरकारने "हे"सांगाव...! आ.संजय गायकवाड यांची सरकारकडे मागणी! काय आहे हा विषय? सरपंचांच्या मुद्द्यावरही कामाच बोलले..
Mar 26, 2025, 09:53 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड सातत्याने नेहमी चर्चेत असतात. आपल्या रोखठोक विधानांनी चर्चेत असणारे आमदार गायकवाड सभागृहातील अभ्यासपूर्ण भाषणांनी देखील सभागृहाचे लक्ष वेधून घेतात. आता नुकतेच त्यांनी सभागृहात केलेली एक मागणी सर्वांनाच सुखावणारी आहे.. महाराष्ट्रात शिवाजी शिक्षण संस्था नामांकित संस्था आहे. या संस्थेला सरकारने एक सूचना करावी, संस्थेचे नामकरण "छत्रपती श्री शिवाजी महाराज शिक्षण संस्था" अस करण्यात यावं अस आ. गायकवाड यांनी म्हटल आहे.
महाराष्ट्रभर शिवाजी शिक्षण संस्था कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव सन्मानाने घेतलं पाहिजे. अद्यापही शिवाजी शिक्षण संस्थेने त्यांच्या नियमात बदल केलेला नाही. त्यामुळे शासनाने त्या लोकांना सांगावं, जिथे जिथे शिवाजी शिक्षण संस्था आहेत तिथे तिथे संस्थेचे नाव छत्रपती श्री शिवाजी महाराज शिक्षण संस्था असं करण्यात यावं असे आ. गायकवाड म्हणाले..
सरपंचांच मानधन वाटप करा..
दरम्यान आ. गायकवाड यांनी सरपंचांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी देखील सभागृहात केली आहे. मागील काळात सरकारने सरपंचांचे मानधन वाढवले. मात्र वाढलेले मानधन अद्यापही रखडलेले आहेत. गावात जातो त्यावेळेला सरपंच आपल्याकडे तशी मागणी करतात, त्यामुळे सरपंचांचे रखडलेले मानधन तात्काळ वाटप करावे अशी मागणी आ.गायकवाड यांनी सरकारकडे केली.