जिल्हा परिषदेचा अख्खा आरोग्य विभाग जाम खुश..! "बुलडाणा लाइव्ह " च्या बातम्यांचे होतेय कौतुक! कलेक्ट–करांच्या बदल्यानंतर सर्वत्र समाधान; कुणी म्हणे,आता कळत असेल तळतळाट काय असतो ते....
जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यासाठी चर्चेचा विषय बनला आहे. आता चर्चेची कारणे काय ? हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. "बुलडाणा लाइव्ह" कडे एकापेक्षा एक तक्रारी प्राप्त झाल्या, तक्रारींची शहानिशा केल्यानंतर उजेडात आलेले सत्य अतिशय भयंकर होते. दोन कलेक्ट–करांनी जिल्हाभर अक्षरशः हैदोस घातला होता. त्यांनी कुणालाच सोडले नाही अन् कुणाचेही ऐकून घेतले नाही. वर्षानुवर्षे ते टेबलाला चिटकून होते, मोठ्या सायबांचा विश्वास त्यांनी कमावला होता. जिल्हाभरात ते संकलनासाठी फिरायचे, त्याची कार्यालयात नोंद नव्हती..मात्र कुठल्या तारखेला ते कुठे होते, तिथे काय झाले याची व्हिडिओ फुटेज सहित नोंद "बुलडाणा लाइव्ह" ला प्राप्त झाली अन् बुलडाणा लाइव्ह ने त्यांचे काही कारनामे समोर आणले अन् त्यांची विकेट पडली..मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोघांच्याही तडकाफडकी बदल्या केल्या. अर्थात एवढ्याने काही झाले नाही, अजून काही विकेट पडायच्या आहेत.
समुदाय आरोग्य अधिकाऱ्याकडून पगारासाठी प्रतिमहिना १००० घेणारा खुर्चीला चिटकून आहे..आणि दोन त्या कलेक्ट–करांचे एकापेक्षा एक बरेच कारनामे चव्हाट्यावर यायचे आहेत.. घेणाऱ्यांचा बुरखा टरा टरा फाटणार आहे. पडद्याआड लपलेलेही सुटणार नाहीत. जेणेकरून त्यांना कळायला पाहिजेत लोकांचा तळतळाट कसा असतो ते..आता "त्या" दोघांकडून पुन्हा एकदा तो टेबल मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात म्हणत्यात.. पाहुयात पुढे काय होते ते...