कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर! जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड तयार करणार; त्यांना जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती!

कोविड तपासणी लॅबही पुन्हा सुरू करण्याचे नियोजन...... 
 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  राज्यात पुन्हा एकदा नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली असली, तरी घाबरण्याचे कारण नाही, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले आहे. त्यांनी जनतेला सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे ते म्हणाले.

  जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत यासंदर्भात तयारी सुरू करण्यात आली असून, ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड तयार केला जाणार असल्याचे जिल्हा  शल्यचिकित्सक डॉ.भागवत भुसारी म्हणाले...

यापूर्वी जिल्ह्यामध्ये कार्यान्वित करण्यात आलेली कोव्हिड लॅब पुन्हा सुरु करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.