हाहाकार...शेळगाव आटोळ मध्ये पुराच्या पाण्यात तरुण वाहून गेला...!

 
 
शेळगाव आटोळ (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेळगाव आटोळ ता.चिखली येथे पुराच्या पाण्यात तरुण वाहून गेला. आज,१७ ऑगस्टला ही घटना घडली. ३ तासांच्या शोधा नंतर तरुण सापडला, मात्र डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले. चेतन वसंता बोर्डे(२०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे..
  प्राप्त माहितीनुसार आज पहाटेच्या सुमारास शेळगाव आटोळ, मिसळवाडी परिसरात तुफान पाऊस झाला. यामुळे नदीला पूर आला होता.चेतन बकऱ्यांचा पाला आणण्यासाठी शिवारात गेला होता. त्यावेळी नदीपात्रात तो पाय घसरून पडला, आणि पुराच्या प्रवाहात वाहून गेला. ही माहिती करताच गावकऱ्यांनी घटनास्थळी पोहचून शोधा शोध सुरू केली. गावातील तरुणांनी पाण्यात उतरून चेतनचा शोध घेतला. दरम्यान सुभाष मिसार यांच्या शेताजवळील बंधाऱ्याजवळ चेतनचा मृतदेह सुरज निकाळजे यांना मिळून आला. या घटनेने शेळगाव आटोळ गावावर शोककळा पसरली आहे. चेतनच्या पश्चात आई-वडील आणि मोठा भाऊ असे कुटुंब आहे...