सिंदखेडराजाच्या गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकाने पैसे वाटून खाल्ले! कुंबेफळच्या सरपंच पतींचा आरोप; कारवाईसाठी आजपासून आमरण उपोषण...

 
सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेड राजा तालुक्यातील कुंबेफळ येथे सरपंच पतींनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सिंदखेडराजा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकाच्या विरोधात हे उपोषण आहे. सिंदखेडराजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मुकेश मोहोळकर आणि ग्रामसेवक सौ. एस. के जगताप यांनी १० लाख रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप उपोषणकर्त्या सरपंच पतींनी केला आहे..
advt
advt.

कुंबेफळ गावात बंजारा वस्तीमध्ये वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत २०२३ –२४ मध्ये  सिमेंट रस्ता बांधकामास परवानगी देऊन बांधकाम ग्रामपंचायत च्या वतीने पूर्ण केले. असे असताना सदर रस्ता बांधकामाचे देयक सिंदखेडराजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मुकेश मोहोळकर आणि ग्रामसेवक सौ. एस के जगताप यांनी संगनमताने वटवून १० लाख रुपयांचा अपहार केला आणि शासनाची व ग्रामपंचायतची दिशाभूल केली असा आरोप सरपंचपती  राजेश इंगळे यांनी केला आहे. गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांविरुद्ध कारवाई करावी यासाठी राजेश इंगळे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत...