भीषण अपघात! सिमेंट पोल घेवून जाणारे ट्रॅक्टर ट्रॉली पलटी; दोन मजुरांचा मृत्यू; पुन्हई-वडगाव रोडवरील घटना
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नांदुरा तालुक्यातील फुली येथून सिमेंटचे पोल घेवून जाणारे ट्रॅक्टरची ट्रॉली पुन्हई फाट्याजवळ पलटी झाली. पोल अंगावर पडल्यामुळे पाचजण गंभीर जखमी झाले. सदर घटना आज २२ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. जखमींना मोताळा ग्रामीण रुगालयातून बुलढाणा येथे हलविण्यात होते. मात्र, उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू झाला. मृतक नांदुरा तालुक्यातील वाडी महाळुंगी येथील रहिवासी आहे.
फुली येथून ट्रॅक्टर क्रमांक एमएच-४०-ए-३४८७ सिमेंटचे पोल घेवून बोराखेडी वडगाव रोडने चालले होले. सदर ट्रॅक्टरमध्ये पाच ते सहा मजूर बसलेले होते. दरम्यान, ट्रॅक्टरची ट्रॉली पुन्हई फाट्याजवळील एका वळणावर पलटी झाल्याने सिमेंटचे ११ पोल मजुरांच्या अंगावर पडल्याने यामध्ये रामदास बेलोकार (वय ४० वर्षे), संतोष बेलोकार (वय ३५ वर्षे), हरीश बेलोकार (वय २३ वर्षे), मंगेश सातव (वय ३२ वर्षे), शुभम खंडारे (वय २१ वर्षे) हे मजूर पोलखाली दबून गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी पोहचून जखमींना बाहेर काढले. पोलिसांना माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून ट्रॅक्टर बाजुला काढून पोलिस स्टेशनला लावण्यात आले आहे.
तसेच जखमींना ग्रामीण रुग्णालय (मोताळा) येथून पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालय (बुलढाणा) येथे हलविण्यात आले. मात्र रुग्णालयात उपचार सुरु असतांना वाडी महाळुंगी येथील मंगेश ज्ञानदेव सातव व रामदासपुंजाजी बेलोकार यांचा मृत्यू झाला. इतर जखमीवर हे बुलढाण्यातील एका हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत.