साखरखेर्डा ठाणेदारांची पत्रकारांसोबत अरेरावी! एकेरी भाषेचा वापर;एसपींकडे तक्रार....

 
साखरखर्डा
साखरखेर्डा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी पत्रकारांशी अरेरावीची भाषा केल्याची तक्रार एसपी विश्व पानसरे यांच्याकडे करण्यात आली. मलकापूर पांग्रा येथे शांतता समितीच्या बैठकीत हा प्रकार घडला. 
 ६ सप्टेंबर रोजी मलकापूर पांगरा येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ठाणेदार गजानन करेवाड यांनी पत्रकार फकीरा पठाण यांना एकेरी संबोधले. अत्यंत खालच्या पातळीवर अरेरावेची व उद्धटपणाची भाषा वापरून गावातील व्यक्तींसमोर अपमानित केल्याचे एसपी पानसरे यांच्याकडे करण्यात आलेल्या तक्रारीत नमूद आहे. यावेळी पत्रकारांनी "त्यांच्याशी तुमचं बोलणं बरोबर नव्हतं"असे ठाणेदारांना म्हटले असता तुम्हाला काय करायचे ते करून घ्या मी तक्रारीला घाबरत नाही असे ठाणेदार करवाडे म्हणाल्याचे एसपी पानसरे यांना दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे ठाणेदार करवाडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी पत्रकार दीपक नागरे, भगवान साळवे, वसीम शेख, कासिम शेख, सचिन खंडारे, विठ्ठल देशमुख, बाजीराव वाघ, समीर कुरेशी,अमोल साळवे, पवन मगर, रमेश कोंढाणे, गुलशेर शेख, इसाक कुरेशी, गजानन काळुसे,फिरोज शेख भगवान नागरे, अशोक इंगळे, गणेश पंजरकर, अफरोज शेख उपस्थित होते.