शिवसंग्रामच्या जिल्हाध्यक्षपदी धडाडीचे नेतृत्व! भगवानराव लंबे यांची नियुक्ती
Apr 28, 2025, 12:28 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसंग्राम संघटनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी भगवानराव लंबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या अध्यक्ष डॉ.ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी ही नियुक्ती केली आहे. तसे नियुक्तीपत्र भगवानराव लंबे यांना देण्यात आले आहे.
मेहकर तालुक्यातील माळखेड येथील राहणारे भगवानराव लंबे सामाजिक कार्यामुळे सुपरचित आहेत. याशिवाय भगवानराव लंबे यांचे शेती क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य आहे. सेंद्रिय शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान वापरून शाश्वत शेती पद्धती अवलंबणाऱ्या आणि जैविक खत वापर करण्यास त्यांनी मोठा पुढाकार घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांना ते सातत्याने मार्गदर्शन देखील करीत असतात. कोविड महामारी मध्ये भगवानराव लंबे यांनी मोठे सामाजिक काम केले. याशिवाय दिव्यांगांना चष्मे वाटप अनाथ, निराधार सेवाभावी संस्थेचे स्वयंसेवक म्हणूनही भगवानराव लंबे काम पाहतात. उत्कृष्ट संघटक म्हणूनही भगवानराव लंबे यांची ओळख असून त्यांच्या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यात शिवसंग्राम संघटना वाढीस मदत होणार आहे.