Special news ल्याव्हऱ्या अन् तितर मध्ये बदलंत "पुनर्विनियोजन".... ! बंगल्यावर ल्याव्हऱ्या तितर घेऊन या अन् निधी घेऊन जा...!

 जिल्हा परिषदेत सीईओ गुलाबराव खरातांच्या कारनाम्यांची तुफान चर्चा ! पदाची गरिमा घालवली म्हणत्यात...! "सब माल डिब्बे" में मुळे एचओडी परेशान...
 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी" या जबाबदारीची गरिमा मोठी.. गावगाड्यातल्या सामान्य माणसाच्या आयुष्याशी थेट संबंध असणारे हे पद..मात्र बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी या पदाची गरिमा घालवली असल्याची चर्चा दबक्या आवाजात जिल्हा परिषदेत सुरू आहे. "बंगल्यावर ल्याव्हऱ्या अन् तितर घेऊन या अन् निधी घेऊन जा" असा प्रकार गुलाबराव खरातांकडून सुरू असल्याचे सांगितले जाते. साधारणतः सर्वसाधारण सभेत होणारे किंवा वर्षातून एखाद दुसऱ्या वेळेस होणारे पुनर्विनियोजन ल्याव्हऱ्या अन् तितर चा कार्यक्रम झाला की आठवड्याला, महिन्याला होते अशीही तुफान चर्चा झेडपी वर्तुळात सुरू आहे.

जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून तर अगदी अलीकडच्या काळापर्यंत आर्थिक विषयांचे पुनर्विनियोजन साधारणतः सर्वसाधारण सभेत किंवा वर्षातून एखाद दोन वेळेस होत असे. मात्र सध्या ते वारंवार होत असल्याची चर्चा असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे गुलाबराव खरात यांच्या अगदी जवळची मंडळी त्यांच्या कारभाराला वैतागली आहेत. अगदी जिल्हा परिषदेतील विविध विभागाचे प्रमुखही हैराण परेशान आहेत. गुलाबराव खरातांकडून थेट कामांची यादीच विभाग प्रमुखांना पाठवली जाते."सब माल डिब्बे" में असाच एकंदरीत खरात यांचा कारभार असल्याने एचओडी परेशान आहेत. स्वतः अनेक एचओडी खाजगीत बोलतांना तशा भावना व्यक्त करतात. अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यातील जवळच्या ठेकेदारांवर खरात यांची विशेष कृपा असल्याचे झेडपी सूत्रांनी सांगितले..

दरम्यान बुलडाणा तालुक्यातील एका सरपंचाने साहेबांच्या बंगल्यावर ल्याव्हऱ्या अन् तितर चा कार्यक्रम घडवून आणला..त्याबदल्यात संबंधित सरपंचाला निधी मिळाला अशी चर्चा पसरली आहे. त्यामुळे बंगल्यावर ल्याव्हऱ्या अन् तितर घेऊन या अन् निधी घेऊन जा अशी उपरोधिक चर्चा झेडपी वर्तुळात ऐकायला मिळते आहे. एचओडी म्हणजेच विभागप्रमुख एखाद्या कामासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गेल्यास "त्यात काही आहे का?" अशीच विचारणा गुलाबराव खरातंकडून होत असल्याचे सांगण्यात येते. एकंदरीत सध्या पुनर्विनियोजन आणि ल्याव्हऱ्या तितर हा झेडपीच्या वर्तुळातील गप्पांचा विषय बनला आहे. याहीपेक्षा एक खतरनाक महाभयानक आणि खळबळजनक विषय आहे.. "मुख्य कार्यकारी अधिकारी, दुसरा एक वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या आकड्यांत झालेली कथित सेटलमेंट.." असा एक खतरनाक विषय गुपचूप बोलल्या जातोय..या विषयाला एक खळबळजनक किनार आहे...त्याबद्दल वाचत रहा "बुलडाणा लाइव्ह"...