BREAKING बुलढाण्यात महिलांनी अडवली एसपी विश्व पानसरे यांची गाडी! काळे झेंडे दाखवले! कारण काय?

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या विरोधासह इतर मागण्यांसाठी काही महिला आमरण उपोषणाला बसल्या होत्या. २२ मार्च पासून जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या आयडीबीआय बँके समोरील जागेत हे उपोषण सुरू होते. दरम्यान आज,२६ मार्चला महिलांनी एसपी विश्व पानसरे यांची गाडी रस्त्यात अडवली. यावेळी एसपी पानसरे यांना काळे झेंडे दाखवण्यात आले..
 जिल्ह्यातील अवैध धंदे, अनधिकृत कॅफे ,अवैध रेती वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक त्वरित बंद करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी महिलांनी उपोषण मांडले होते. दरम्यान आज एसपी विश्व पानसरे आपल्या शासकीय निवासस्थानावरून एसपी कार्यालयाकडे जात असताना महिलांनी रस्त्यातच त्यांची गाडी अडवली. त्याने काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली..यावेळी बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतले आहे..