लग्नाच्या अक्षता कुणीतरी फेकून मारल्या अन् राडा झाला....! दोन गटांच्या परस्पर विरोधी तक्रारी! ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल! येळगावचे मॅटर काय?

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा शहरा जवळील येळगाव येथे राडा झाला. शुल्लक कारणावरून एकाच्या डोक्यात लोखंडी पान्हा चे तीन वार करण्यात आले. पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला तर तुला अजून मारेल अशा धमक्याही देण्यात आल्या...लग्नाच्या अक्षता फेकून मारल्यावरून हा वाद झाल्याचे समजते...

 
 या प्रकरणात जखमी झालेल्या निखिलचे वडील दीपक काशीराम जंजाळ यांनी याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार दिपक जंजाळ यांच्या नानमुखाच्या कार्यक्रमाच्या दिवशी रात्री मांडवाची मोळ अक्षता वाटपाचा कार्यक्रम होता. त्यासाठी निखील दिपक जंजाळ हा देखील गावातील मुलांसोबत अक्षता वाटण्यासाठी गावात गेला होता. वाजंत्री म्हणून येळगाव येथीलच मयूर विठ्ठल विरशिद हा काम करत होता. गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मयूरच्या डोक्यात मागून कुणीतरी अक्षता फेकून मारल्या. मयूरला वाटले की निखिलनेच अक्षता फेकून मारल्या. त्यामुळे त्याने रागाच्या भरातच निखिलच्या डोक्यात लोखंडी पान्हा चे तीन वार केले. निखिलच्या डोक्यातून रक्त वाहू लागल्याने त्याच्या मित्रांनी त्याला सरकारी दवाखान्यात दाखल केले. अशा तक्रारीवरून पोलिसांनी मयुर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे...
दुसरीकडे याच प्रकरणात परस्पर विरोधी तक्रार दाखल झाली आहे. बँड वादक सचिन विठ्ठल विरशीद यांच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. आरोपींमध्ये निखिल दीपक जंजाळ, आदित्य राजू सोळंके, गौरव कापसे, वैभव मुंढे सर्व रा.येळगाव यांचा समावेश आहे. तक्रारीनुसार अक्षता वाटपाचा कार्यक्रम सुरू असताना आरोपी बाँड पिऊन आले, त्यांनी काहीच कारण नसताना काठीने तसेच लाथा बुक्क्यांनी पाठीवर मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.