मलकापूर पांग्रा येथे कडकडीत बंद! कारण काय? वाचा....
Updated: Dec 16, 2024, 13:37 IST
मलकापूर(अमोल साळवे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काही दिवसांआधी परभणी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती. तर पोलीस कोठडीत कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत आहेत, त्याचाच एक भाग म्हणून आज,१६ डिसेंबरला
मलकापूर पांग्रा येथे संविधान प्रेमी नागरिकांनी बंदचे आवाहन केले होते..त्यामुळे मलकापूर पांग्रा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला..
मलकापूर पांग्रा येथे व्यवसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवली. परभणी येथील त्या घटनेच्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. त्या घटनेच्या संदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. बंद यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य राजू साळवे यांच्या नेतृत्वात कैलास साळवे, अभिमान साळवे, दिलीप काकडे, गजानन चरवे, किशोर साळवे, संदीप साळवे, अक्षय साळवे, प्रदीप मगर, बबन राठोड, सुनील काकडे, विनेश साळवे, सुनील बनसोडे, भीमराव साळवे आदींनी पुढाकार घेतला...