सागवन गावात श्रीराम नवमी उत्साहात साजरी! रामनामाचा जयघोष करत भाविकांनी घेतले प्रभू श्रीरामांचे दर्शन

 
 
सागवन (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – सागवन गावात श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरी करण्यात आली. सकल हिंदू समाज बांधवांतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रभू श्रीराम जन्मोत्सवाचे पारंपरिक आयोजन करण्यात आले. प्रभू श्रीरामचंद्राच्या प्रतिमेची विधिवत पूजा करून गावातील लहानथोरांनी दर्शनाचा लाभ घेतला.
गावामध्ये अनेक वर्षांपासून रामनवमी निमित्त धार्मिक सोहळे आणि महाप्रसाद यांचे आयोजन होत आले आहे. यंदाही सकाळपासूनच वातावरण भक्तिमय झाले होते. संध्याकाळी पालखी सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या आध्यात्मिक कार्यक्रमात गावातील तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला व रामनामाचा जयघोष केला. प्रभू श्रीरामाच्या जयजयकाराने संपूर्ण गाव भक्तीमय झालं.
या यशस्वी आयोजनासाठी रामराज्य युवा मंडळआणि छत्रपती मित्रमंडळ यांच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी ज्ञानेश्वर राजगुरे, राजू सोनुने, नितीन जंजाळ, मुकेश शिरसाट, रमणसिंह राजपूत, सतीश भाकरे पाटील, सचिन सोनुने, आत्माराम सोनुने, दगडु खांडवे, बंडू देशमुख, अंकुश भाकरे, कार्तिक राजपूत, घनश्याम बिबे, वैभव राजपूत, दीपक राजपूत, यश शिंदे, मयूर महामुने, प्रतीक सोनुने, बबलू सोनुने, विनोद भाकरे, विजय बरडे, अविनाश डुकरे, रोहन महामुने, गौरव गोरे, ओम राजपूत, प्रीतम राजपूत, तेजस गाडेकर, राम गाडेकर, रितेश जवंजाळ, प्रथमेश चव्हाण, रवी चव्हाण, सौरभ शेळके, गौरव पोपलघट यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.