बुलढाण्यात शिवसेना नेत्याचे सोशल मीडिया अकाउंट हॅक! पोलिसांत तक्रार.....

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंटवर अज्ञात हॅकर्सकडून अनधिकृतपणे हस्तक्षेप करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून त्यांच्या मित्रपरिवारातील अनेकांना संशयास्पद मेसेजेस, तसेच आर्थिक व्यवहारांची मागणी करणारे संदेश प्राप्त होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही मेसेजकडे दुर्लक्ष करावे आणि त्यावरून कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार अथवा संवाद करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भात संबंधित अज्ञात हॅकरविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून लवकरच सर्व सोशल मीडिया अकाउंट पुन्हा सुरळीत सुरू करण्यात येतील, असे युवानेते मृत्युंजय गायकवाड यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.