शिवसंकल्प शिवसेना जिल्हा पदाधिकाऱ्यांचे ५ नाेव्हेंबरला प्रशिक्षण शिबीर; प्रशिक्षण शिबिराला पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे केंद्रीय मंत्री जाधव यांचे आवाहन...
शिवसेना संपर्क कार्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सदर प्रशिक्षण शिबिरा संदर्भात सविस्तर माहिती दिली. स्थानिक भूमिपुत्र शेतकरी भवन येथे उभारण्यात आलेल्या विशेष शामियान्यात हे शिबिर होणार आहे असे सांगून प्रतापराव जाधव व संजय रायमुलकर यांनी पुढे सांगितले की, शिबिरात सकाळी दहा ते दुपारी चार पर्यंत विविध सत्र पार पडणार आहेत. सकाळी नऊ वाजता पदाधिकारी व निमंत्रितांसाठी नोंदणी व अल्पोपहार, दहा वाजता प्रतापराव जाधव व सार्वजनिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत उद्घाटन, त्यानंतर लक्षवेध ॲप प्रशिक्षण, अकरा वाजता धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष याबाबत डॉ. राजश्री आहेर राव यांचे व्याख्यान, पावणे बारा वाजता राजकारणात समाज माध्यमांचा प्रभाव या विषयावर प्रतीक शर्मा यांचे भाषण आणि संघटन बांधणी या विषयावर शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांचे व्याख्यान होणार
 सव्वा बारा वाजता राजकारणात महिलांचा सहभाग या विषयावर शिवसेना प्रवक्ते डॉ. ज्योती वाघमारे यांचे भाषण, दुपारी एक वाजता प्रा. राजेश सरकटे संभाजीनगर यांचा स्वर्विहार हा गीतांचा कार्यक्रम , दुपारी दोन वाजता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, प्रतापराव जाधव, मंत्री शंभूराज देसाई ,गुलाबराव पाटील ,संजय राठोड, संजय शिरसाट, माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या उपस्थितीत शिबिराचा समारोप होणार असल्याची माहिती ना. प्रतापराव जाधव यांनी दिली. शिबिरासाठी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, शिवसेना सचिव संजय मोरे, आमदार मनीषाताई कायंदे, डॉ. ज्योती वाघमारे, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, डॉ. शशिकांत खेडेकर ,जगदीश गुप्ता, नारायण गव्हाणकर, ज्ञानेश्वर धाने पाटील, श्रीकांत देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
              
पत्रकारांच्या विविध प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले की, येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीला प्राधान्य राहील .महायुतीतील तीनही पक्षांचा सन्मान राखत युती केली जाईल. सर्व निर्णय वरिष्ठांचे आदेशाने होतील. इलेक्टिव्ह मेरिटवर उमेदवाऱ्या दिल्या जातील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील अडीच वर्षात मेहकर, लोणार तालुक्यात पाच हजार कोटींची कामे झाली .बरीच मंजूर कामे अजून सुरू व्हायची आहेत. आमच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना, विद्यमान आमदाराला विचारा की,त्यांनी वर्षभरात एक तरी काम मंजूर करून आणले आहे का ? . मेहकर शहरात आम्ही ९३२ कोटींची विकास कामे केली. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगती मध्ये आहेत, अशी माहिती संजय रायमुलकर यांनी दिली. यावेळी बाजार समिती सभापती माधवराव जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश तात्या वाळूकर, उपजिल्हाप्रमुख किसनराव बळी, दिलीपबापू देशमुख, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव, नीरज रायमुलकर, अजय उमाळकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते
