शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे )प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न; आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने घेण्यात आला आढावा;

 जास्तीत जास्त जागा निवडून येण्याच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांनी मांडले नियोजन...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :बऱ्याच कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. या निवडणुकीत जास्तीत जास्त शिवसैनिकांना सत्ता पदे मिळावीत यासाठी आपल्याला सर्वांना नियोजनपूर्वक कामगिरी पार पाडावी लागणार आहे. यासाठी शहर प्रमुख, तालुकाप्रमुख व उपजिल्हाप्रमुखांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरचा वस्तुनिष्ठ अहवालरुपी आढावा शुक्रवारी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या महत्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला.

बुलढाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भावनात शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी ही बैठक पार पडली.
यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, आमदार सिद्धार्थ खरात, सहसंपर्कप्रमुख छगनदादा मेहत्रे, वसंतराव भोजने , डी एस लहाने, जिल्हा समन्वयक तथा निवडणूक प्रमुख संदीपदादा शेळके, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. चंदाताई बढे, सौ विजयाताई खडसान, जिल्हा संघटक एडवोकेट सुमित सरदार, डॉक्टर गोपाल बच्छिरे, युवा सेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे , गजानन धांडे यांनी मार्गदर्शन केले.
होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी दरम्यान जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी आपापल्या तालुक्यातील प्रत्येक मतदार संघातील नगरपरिषद, जिल्हा परिषद गट,व पंचायत समिती गण या संदर्भात माहिती दिली. 
यावेळी किसान सेना जिल्हाप्रमुख अशोक मामा गव्हाणे, गजानन बिलेवार, उपजिल्हाप्रमुख अविनाश दळवी, बद्रीनाथ बोडखे, उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर , 
तालुकाप्रमुख दादाराव खार्डे , विजय इतवारे, विजयकुमार इंगळे, तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, तालुका प्रमुख दीपक चांभारे पाटील, तालुकाप्रमुख श्रीकिसन धोंडगे, तालुकाप्रमुख ईश्वर पांडव, तालुकाप्रमुख रवींद्र झाडोकार, श्रीराम खेलदार, राजेंद्र बुधवत, सिद्धेश्वर आंधळे, संजय दांडगे, हर्षल आखरे, 
विधानसभा समन्वयक संजय वडतकर, विधानसभा संघटक विजय बोदडे, भीमराव पाटील, अरुण खडके, विष्णू मुरकुटे, सुनील घाटे, विजय बोदडे, 
शहर प्रमुख किशोर गारोळे, हरिदास गनबास, रवींद्र जैन, गजानन जाधव, नारायण हेलगे, योगेश पल्हाडे, रमेश ताडे , उल्हास भुसारे, युवा सेना तालुकाप्रमुख संजय शिंदे, एडवोकेट आकाश घोडे , अनिल नरोटे, बी.टी. मस्के यांचे सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 
स्वतः लक्ष घालणार : आ.सिद्धार्थ खरात ..
मेहकर व लोणार तालुकाच नव्हे तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये गट आणि गण या दृष्टीने आपण स्वतः जिल्हाभर कार्यकर्त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहू. या निवडणुकीत लक्ष घालून कार्यकर्त्यांच्या सत्ता पदासाठी जोमाने लढू अशी ग्वाही मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिली.
महाविकास आघाडीसाठी प्रयत्न : प्रा. खेडेकर 
ग्रामीण भागात सरकारच्या कामगिरीबद्दल प्रचंड रोष आहे. शेतकरी आज वाऱ्यावर आहेत. त्यांच्या हक्कासाठी स्थानिक पातळीवर लढणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी महाविकास आघाडीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत असे असले तरी संपूर्ण जिल्हाभरात शिवसेनेची ताकद या निवडणुकीतून दिसून येईल, असे यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर म्हणाले.
जिल्हा परिषदेवर भगवा फडकवू : जालिंदर बुधवत..
येत्या निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तरी देखील आज संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक गट, गण या दृष्टीने उमेदवारांची चाचपणी आणि स्थानिक पातळीवर समीकरण यांचा अहवाल पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेवर शिवसेनेच्या माध्यमातून भगवा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.