खळबळजनक .! बुलडाण्याच्या चांडक ले आऊट मध्ये दोन पुरुष अन् एका महिलेचे धक्कादायक कृत्य! धुणी भांडी करणाऱ्या महिलेच्या १६ वर्षीय मुलीचे किडनॅपिंग; विकायला नेले जालन्याला...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा शहरातील चांडक लेआउट मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. धुणी भांडी करणाऱ्या एका महिलेच्या अल्पवयीन मुलीचे दोन अनोळखी पुरुष आणि एका अनोळखी महिलेने किडनॅपिंग केली आहे. तशी तक्रार मुलीच्या आईने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेने चांडक ले आऊट परिसरात एकच खळबळ उडाली आहे..
 नंदा दयानंद आव्हाड (४२) ह्या धुणी भांडी करतात. त्या चांडक लेआउट मध्ये काळवाघे यांच्या घरी भाड्याने राहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना एकूण ६ मुली असून चार मुलींचे लग्न झालेले आहे. अंजली(१६) आणि मिताली (१२) या दोन मुली त्यांच्यासोबत राहतात. दरम्यान काल,२१ मार्चच्या सायंकाळी ४ वाजता नंदा आव्हाड यांच्या घरासमोर एक ऑटो आला. त्या ऑटोतून दोन अनोळखी पुरुष व एक अनोळखी महिला उतरली. " तुझ्या मुलीने आमचे ३५ हजार रुपये चोरले आहेत" असा आरोप ऑटोतून उतरलेल्या तिघांनी केला. त्यावेळी माझ्या मुलीने चोरी केली नाही असे नंदा आव्हाड यांनी त्या तिघांना सांगितले. त्यावेळी त्यातील महिला म्हणाली की" मी तुझ्या मुलीला जालन्यात नेऊन विकते". यानंतर त्या अनोळखी तिघांनी मोठी मुलगी अंजली ला किडनॅप करून ऑटो टाकून घेऊन गेले. या घटनेनंतर महिलेने मावस भावासोबत पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली. तक्रारीवरून दोन अनोळखी पुरुष व एका अनोळखी महिलेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..