दुसरी इनिंग...चौफेर विकास! आमदार संजय गायकवाडांच्या प्रयत्नांतून विविध विकास कामांसाठी पुन्हा ३ कोटी...! "ही" कामे होणार...!
Jan 15, 2025, 10:06 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा विधानसभा मतदार संघात विविध विकास कामासाठी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या प्रयत्नाने ३ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून मोताळा व बुलढाणा नगरपालिका अंतर्गत विविध विकास कामे केली जाणार आहेत. आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यप्रणालीची दुसरी इनिंग आता सुरू झाली आहे. त्यांनी मोताळा नगरपंचायत व बुलढाणा नगरपालिका अंतर्गत विकास कामासाठी निधीची मागणी केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने शासनाच्या वतीने बुलढाणा विधानसभा मतदारसंघात ३ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. या निधीच्या माध्यमातून बुलढाणा नगरपरिषद अंतर्गत दिव्यांग कल्याण शाळा परिसर विकासासाठी ५० लाख निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
धर्मवीर आखाडा महिला जिमखाना यात विविध व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठी ४० लाख रुपये तसेच तेजज्ञान फाउंडेशनचे सभागृह विकासासाठी ४० लाख रुपये, वारकरी भवनाची उर्वरित विकास कामे तसेच प्रभाग क्रमांक आठ मधील नथ्ये यांच्या घरासमोरील रस्त्याचे बांधकाम करिता ३७ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मोताळा नगरपंचायतीमध्ये नगरपंचायत हद्दीतील डिव्हायडर लाईट पीकॉक लाइटिंगसाठी १ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. जुना गाव येथे नगर पंचायतची व्यायाम शाळा बांधकामा करिता २० लाख, नगरपंचायत हद्दीतील जैन भवन विकासासाठी १२ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे....