चिखलीचे ठाणेदार संग्राम पाटलांचा एसपींच्या हातून सन्मान..! कामच तसे केले....
Jan 28, 2025, 09:50 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या निवडणुकीमध्ये विधानसभा ठाणेदार संग्राम पाटील यांनी केलेल्या कार्याची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी १६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करुन त्यांचा गौरव केला.
ठाणेदार संग्राम पाटील यांनी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ हि निःपक्ष व भयमुक्त वातावरणात पार पडावी, या अनुषंगाने आदर्श आचार संहिते दरम्यान मतदारांवर प्रभाव टाकण्याच्या उद्देशाने बाळगलेली नगदी एकुण ७७लाख ५६ हजार ४७९ रुपये रक्कम चिखली पोलीस स्टेशन हद्दीत जप्त केली. व विधानसभा निवडणुक २०२४ हि निःपक्ष व भयमुक्त पार पाडण्यासाठी व आदर्श आचार संहितेच योग्य ती अंमलबजावणी केली. यामुळे मतदान प्रक्रिया पार पडली. यामुळे पोलीसांची जनमानसातील प्रतिमा उंचावण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केली असल्याने पोलीस अधीक्षक पानसरे यांनी ठाणेदार संग्राम पाटील यांना गौरन्वित केले.