जिल्हाभर विविध कार्यक्रमांनी साजरा होणार संदीप शेळकेंचा वाढदिवस
Mar 12, 2025, 18:32 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना (उबाठा) जिल्हा समन्वयक तथा राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त १३ मार्च रोजी जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान महायज्ञाचा समारोप होणार आहे. येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात सकाळी ९ वाजत रक्तदान शिबिराला सुरुवात होईल. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

दरवर्षी संदीप शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. गतवर्षी रक्तदान महायज्ञाअंतर्गत तीन हजारांपेक्षा जास्त बॉटल रक्त संकलित झाले होते. यावर्षी सुद्धा युवकांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. तसेच जिल्ह्यातील रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण यावेळी करण्यात येणार आहे.
सहकार, समाजकारण आणि राजकारणात संदीप शेळके सक्रिय आहेत. जिल्हाभर त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वात राजर्षी शाहू मल्टिस्टेट को- ऑप. क्रेडिट सोसायटीची घोडदौड सुरू आहे. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी जनसेवेत स्वतःला झोकून दिले आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचा आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. युवा वर्गात ते विशेष लोकप्रिय आहेत.