साधु - संत हे जगाचा वारसा आहेत! जैन मुनी विशेषसागरजी यांचे प्रतिपादन...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सर्वच धर्मांमध्ये गुरुच्या महिमेच वर्णन केले आहे. गीता ग्रंथात गुरु या शब्दाला महामंत्र म्हटले आहे. गुरु म्हणजे शुभचिंतक, हितचिंतक, मार्गदर्शक, उपकारकर्ता. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीचे जीवनात गुरु नाही, त्यांचे जीवन सुरू होत नाही. जीवनात गुरु नसलेकी व्यक्ती मनाचा राजा बनते. आपण जे काही बोलतो ते बरोबर आहे, आपण जे करतो तेच बरोबर असे उद्गार प. पू. वात्सल्य शिरोमणी श्रमण मुनी श्री १०८ विशेषसागर महाराज यांनी काढले. 
   जैन मुनि विशेष सागर जी महाराजांच्या संघाचे आगमन सोमवारी ता 31 बुलडाणा शहरात झाले. महावीर नगर येथील चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरात प्रवचनदरम्यान ते बोलत होते. मुनी श्री विश्वदक्ष सागरजी महाराज व क्षुल्लकजी
विश्वतीर्ण सागर जी यावेळी उपस्थित होते.
 मुनिश्री पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात, येथे म्हण आहे की साधू संत येती घरा तोचि दिवाळी दसरा. साधु - संत हे जगाचा वारसा आहेत. ज्या समाजात साधु - संतांचा आदर केला जातो, तिथे हिरवळ आणि समृद्धी असते. दिगंबर संत हे त्याग आणि तपस्येचे जिवंत मूर्ति आहेत. ते धन आणि संपत्तीचा त्याग करतात. त्यांच्याकडे पिच्छी-कमंडल आणि फक्त आवश्यक शास्त्र च ठेवतात. उन्हाळ्यात ए. सी कूलर, पंखा इत्यादी आणि हिवाळ्यात रूम हीटर इत्यादी वापरत नाही. दिवसातून एकदाच शुद्ध अन्न घेतात, चौक्यामधे चवीची नाही तर शुद्धतेची काळजी घेतात, संतांमध्ये स्व-परोपकार सोबत परोपकाराची भावना ठेवतात, समाजात कैची सारखे नाही तर ते सुईसारखे काम करतात . समाजाला एकत्र करण्याबद्दल बोलतात. पंथवाद, संतवादविषयी नव्हे तर आगमविषयी बोलतात . पंथवाद- संतवाद माणसाला संसारात भ्रमण करायला लावतो आणि जो आगमचे पालन करतो तो एके दिवशी संसार पार करतो.प्रवचनाला मंदिर चे पदाधिकारी तसेच धर्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.