शेळगाव आटोळ मध्ये चौकात फडकतोय भगवा! भगवा झेंडा काढू देणार नाही, तरुणांची भूमिका....

 
 शेळगाव आटोळ (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील एका चौकात रात्री कुणीतरी भगवा झेंडा रोवला आहे. हा भगवा झेंडा डौलाने फडकत आहे.. भगव्या झेंड्यामुळे रहदारीस कोणताही अडथळा निर्माण होत नाही. भगवा झेंडा त्यागाचे आणि शौर्याची प्रतीक आहे, भगवा झेंडा आमची अस्मित आहे त्यामुळे प्रशासनाला भगवा झेंडा काढू देणार नाही अशी भूमिका तरुणांनी घेतली आहे. प्राप्त माहितीनुसार यंत्रणेकडून भगवा झेंडा काढून टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत..मात्र काहीही झाले तरी भगवा झेंडा काढू देणार नाही अशी भूमिका आता तरुणांनी घेतली आहे..
Kute Advt