

निर्दयी सॉफ्टवेअर इंजिनिअर बापाने ६ महिन्याच्या चिमुकलीला भिंतीवर फेकले; बुलडाणा शहरातील आज सकाळची घटना....
Apr 1, 2025, 12:29 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा शहरातून धक्कादायक अन् तेवढीच संतापजनक बातमी समोर आली आहे. पती पत्नीच्या वादातून एका निर्दयी बापाने ६ महिन्यांच्या चिमुकलीला घरातील भिंतींवर फेकले..चिमुकलीला सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..
प्राप्त माहितीनुसार आरोपी मच्छी ले आऊट मधील असून पुण्यात एका कंपनीत इंजिनिअर आहे. आज सकाळी पती पत्नीत घरगुती कारणावरून वाद झाला. या वादातून निर्दयी बापाने ६ महिन्यांच्या चिमुकलीला भिंतीवर फेकले..चिमुकलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही..