१८ दिवसानंतर दिल्लीहून परतले; बुलडाण्याच्या द्वारका नगरातील घरी आल्यावर दृश्य पाहून बसला शॉक...!

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा शहरात छोट्या मोठ्या चोरट्यांचा हैदोस सुरूच आहे. आता द्वारका नगरातील एका घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. घरातील रोख रक्कम आणि दागिने घेऊन चोरटे पसार झाले.. बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार देण्यात आली आहे..

  बुलढाणा शहरातील द्वारका नगरात प्रकाश उबहंडे राहतात. ते सेवानिवृत्त असून त्यांचा मुलगा विशाल हा एअर फोर्स मध्ये दिल्लीला नोकरीला आहे. अधून मधून ते मुलाच्या भेटीसाठी दिल्लीला जातात. ३ मार्चपासून ते कुटुंबीयांसह दिल्लीला गेले होते. काल ते घरी परतले, घरी आल्यानंतर त्यांना धक्काच बसला. घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात जाऊन पाहिल्यावर कपाटाचा दरवाजा उघडा होता. कपाटातील कपडे इतरत्र पडलेले होते. कपाटाची लॉकर तपासले असतात त्यात ठेवलेले २० हजार रुपये गायब होते. नातवाचे दागिनेही गायब होते, असा एकूण २८५०० रुपयांचा मुद्देमाल गायब असल्याचे प्रकाश उबरहंडे यांनी तक्रारीत म्हटले आहे...