बुलढाण्यात पु.हेडगेवार चौक नामफलकाचे नूतनीकरण...

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शहरातील एडे़ड हायस्कूलजवळील परमपूज्य डॉ. हेडगेवार चौक येथील नामफलकाचे नूतनीकरण व उद्घाटन आज उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा.आ.विजयराज शिंदे ,माजी नगराध्यक्ष गोकुळ शर्मा, व संस्कृतभारतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजयराव जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
सुमारे वीस वर्षांपूर्वी, माजी नगराध्यक्ष गोकुळ शर्मा यांच्या कार्यकाळात नगरपालिकेत ठराव करून या चौकाचे नामकरण करण्यात आले होते. या चौकातील जुना नामफलक कालबाह्य झाल्यामुळे त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, "नगरपालिका निवडणुका झाल्यानंतर या चौकात डॉ. हेडगेवार यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल."
या कार्यक्रमास बाबा वरणगावकर, रवींद्र गणेशे, बाळकृष्ण अयाचीत, डी. डी. जोशी, मुकुंद जोशी, शहराध्यक्ष मंदार बाहेकर, नेमिनाथ सातपुते, विश्राम पवार, चंद्रकांत बर्दे, अण्णा पवार, दत्ता शिंदे, माजी शहराध्यक्ष अनंता शिंदे, माजी नगरसेवक अरविंद होंडे, सुधीर भालेराव, प्रवीण महाजन, बुलढाणा ग्रामीण अध्यक्ष सतीश पाटील,नंदू लवंगे,प्रदीप बेगाणी, दशरथसिंग राजपूत, योगेश राजपूत, सचिन टेंभीकर, श्रेयस देशमुख, अमित कुलकर्णी, निलेश मुठ्ठे, हरिनारायण गायकवाड, अजित गुळवे, मुकुंद देशपांडे, प्रदीप तोटे, तुषार पडोळ, यतीन पाठक, किरण नाईक, विवेक काळकर, सुधीर भालेराव,प्रसाद कासखेडीकर ,मुकुंद कुलकर्णी, देवकत्ती अण्णा, चौथनकर सर, रामजी त्रिपाठी, ज्ञानेश्वर मांजरे, नितीन जयस्वाल, गणेश फेपाळे, किशोर गवळी, अभिषेक वायकोस, श्रेयस भांगे, ज्ञानेश्वर मांजरे ,सचिन सूर्यवंशी, केशव बेंडवाल तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.