लोणार, मेहकरच्या शेतकऱ्यांना दिलासाना.जाधव-ना.बावनकुळे यांच्यात मंत्रालयात बैठक!अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना मदतीबाबत सकारात्मक चर्चा...
या बैठकीत केंद्रिय मंत्री जाधव यांनी अतिवृष्टीने बाधित क्षेत्रांतील नुकसानाची माहिती सविस्तरपणे महसूलमंत्र्यांसमोर मांडली. शेतजमिनी खरडून जाणे, वाळू व दगडांच्या ढिगाऱ्यांमुळे शेतीअयोग्य जमिनी निर्माण होणे याबाबत त्यांनी छायाचित्रांच्या माध्यमातून स्थिती स्पष्ट केली.
बैठकीदरम्यान महसूलमंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली असून तात्काळ उपाययोजनांची हमी दिली. जाधव यांनी नुकतेच (२८ व २९ जून) बाधित गावांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली होती. दौऱ्याच्या वेळीच त्यांनी जिल्हा प्रशासनाला पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश दिले होते.
या बैठकीनंतर राज्य शासनाकडूनही तातडीने पंचनाम्यांचा संपूर्ण अहवाल सादर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मंत्री जाधव यांनी शेतकऱ्यांना लवकरच भरीव आर्थिक मदत मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासन आणि शासन पातळीवर प्रयत्न सुरू असून लवकरच मदतीचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.