पीकविम्यासाठी रविकांत तुपकर आक्रमक! जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात सुरु केले मुक्काम आंदोलन; जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडत नाही तोपर्यंत माघार नाही..
Updated: Sep 26, 2024, 15:09 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रलंबित पीक विम्याच्या प्रश्नासंदर्भात रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारकडून वारंवार तारीख पे तारीख देण्यात येत असल्याच्या धोरणाचा निषेध तुपकर यांनी केला आहे. १५ सप्टेंबर पर्यंत पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असा शब्द कृषी सचिवांनी याआधी दिला होता, तो शब्द सरकारने पाळला नाही म्हणुन तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
जिल्हा कृषी अधीक्षक मनोज ढगे यांच्या कार्यालयात तुपकर अंथरूण आणि पांघरून सोबत घेऊन गेले. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याचे पैसे पडत नाहीत तोपर्यंत आपण इथेच मुक्काम करणार आहोत असे म्हणत रविकांत तुपकर यांनी ठिय्या मांडला आहे.