राणा फाउंडेशनचा दहावा वर्धापन दिन! चिखलीत आज शिवव्याख्याते राहुल गिरी यांचे व्याख्यान
Feb 15, 2025, 11:42 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राणा फाउंडेशनच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त चिखलीत आज शिवचरित्र व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता चिखली शहरातील हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह स्मारकाजवळ हा दणदणीत व्याख्यानाचा कार्यक्रम होणार आहे. बीड येथील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते राहुल गिरी यांचे व्याख्यान होणार आहे..
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधरजी महाले यांची देखील विशेष उपस्थिती राहणार आहे. "आजची पिढी घडवण्यासाठीचा दीपस्तंभ: शिवचरित्र" या विषयावर राहुल गिरी यांचे व्याख्यान होणार आहे.या कार्यक्रमासाठी समस्त शिवभक्तांनी, तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राणा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे...