तहसील कार्यालयासमोरच मांडला 'रमी'चा डाव; काेकाटे यांच्याविराेधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभिनव आंदाेलन! कृषिमंत्री माणिक कोकाटे यांचा राजीनामा घ्या: प्रसेनजीत पाटिल यांची मागणी..!

 
 जळगाव जामाेद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव काेकाटे यांचा विधीमंडळाच्या अधिवेशनात माेबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.शेतकरी संकटात सापडलेले असताना कृषीमंत्री जंगली रमी खेळण्यात व्यस्त हाेते. त्यामुळे, कृषीमंत्री काेकाटे यांच्याविरुद्ध जळगाव जामाेद येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार ) वतीने तहसील कार्यालयासमाेर रमीचा डाव मांडून अभिनव आंदाेलन करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील असलेले कृषीमंत्री माणिकराव काेकाटे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी प्रेसनजीत पाटील यांनी यावेळी केली. 

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनादरम्यान, कृषिमंत्री माणिक कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळत असतानाच वीडियो वायरल झाला. राज्याच्या काही भागात जाेरदार पाऊस आहे तर काही भागात पावसाने दांडी मारली. त्यातच हुमनी अळीने साेयाबीनचे पीक पाेखरुन काढले आहे. सरकारने आश्वासन दिलेली शेतकरी कर्जमाफी केली जात नाही. हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून कृषिमंत्री माणिक कोकाटे विधानभवनात कामकाज चालू असतांना मोबाईल वर रमी खेळतात ही राज्यासाठी आणि या महायुती सरकार साठी शरमेची बाब असल्याचे राकाॅने म्हटले आहे.
कृषिमंत्री कोकाटे यांच्या या कृतिचा निषेध म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्ष जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने २३ जुलै राेजी जळगाव जामोद तहसील मध्ये तहसीलदार यांच्या कार्यालया समोर पत्ते खेळून निषेध व्यक्त करण्यात आला. कृषिमंत्री यांचा राजीनामा मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते प्रसेनजीत पाटिल यांनी केली. यावेळी प्रसेनजीत पाटिल, विश्वासराव भालेराव, प्रमोद सपकाळ, एम.डी. साबीर, ईरफान खान, शेख जावेद,एजाज देशमुख, विष्णु रोठे,हनुमंत देशमुख,महादेव भालतडक, सिद्धार्थ हेलोड़े,आशिष वायझोडे, दत्ता डिवरे,वामन गुड़ेकर,श्रीकृष्ण जाधव, अकील शाह, तुकाराम गटमने यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.