राजमाता महोत्सवाला उद्यापासून बुलढाण्यात सुरुवात! सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी येणार...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अभिनेत्री तथा नृत्यांगणा सोनाली कुलकर्णी उद्या २८ फेब्रुवारी रोजी बुलढाण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी बनविलेल्या उत्कृष्ट व दर्जेदार उत्पादनांच्या प्रदर्शन व विक्रीसाठी बुलढाण्यात शुक्रवार, २८ फेब्रुवारीपासून राजमाता महोत्सवाला सुरुवात होणार आहे. ग्राम विकास व पंचायत राज विभाग उमेद या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत शहरातील जिजामाता प्रेक्षागार क्रीडा व व्यापारी संकुल येथे ४ मार्चपर्यंत विभागीय, जिल्हा व मिनी सरसअंतर्गत हा महोत्सव साजरा केला जाणार आहे. महोत्सवात १५० स्टॉल्सद्वारे प्रदर्शन व उत्पादनांची विक्री केली जाणार आहे.
बुलढाणा
सांस्कृतिक कार्यक्रमाचे खास आकर्षण असलेली अभिनेत्री तथा नृत्यांगणा सोनाली कुलकर्णी सायंकाळी सहा वाजता आपला नृत्याविष्कार सादर करणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने या महोत्सवाची तयारी पूर्ण केली आहे. राजमाता महोत्सवाचे उ‌द्घाटन पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तसेच यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री ना. रक्षा खडसे, कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांच्यासह आ.किरण सरनाईक, आ. वसंत खंडेलवाल, आ. धीरज लिंगाडे, आ. चैनसुख संचेती, आ. संजय कुटे, आ. संजय गायकवाप्रमुख श्वेता महाले, आ. सिद्धार्थ खरात, आ. मनोज कायंदे आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.